Thursday, December 15, 2005
झाडांवरच्या कविता ..
१) विसाव्यासाठी ..
अलिकडे स्वप्न डसत नाही
सय सलत नाही,
जीव जडत नाही
की ऊर भरून येत नाही ..
समोर तटस्थ उभे आहे
पर्णहीन झालेले एक झाड
जे फ़ळत नाही, फ़ुलत नाही
बहरत नाही मी मोहरत नाही
हिरवळीच्या वाटेने जाताना
आपले काहीही नसण्याचे
दुखणे अनावर जागे होते ..
... तेंव्हा खास विसाव्यासाठी
ह्या झाडाची निवड केली आहे ...
२) संवादाला ...
.. पाचूच्या ह्या नवख्या बेटावर
माणसांपेक्षा झाडेच भेटतात
पाहिजे अन् तेंव्हा तिथे ...
बिनकामाचे अन् अव्यवहाराचे
सांगावे आजकाल कुणापुढे?
मुकपणे मग संवाद जमे
झुकून सळसळणार्या
ह्या मित्रापुढे ...
अलिकडे स्वप्न डसत नाही
सय सलत नाही,
जीव जडत नाही
की ऊर भरून येत नाही ..
समोर तटस्थ उभे आहे
पर्णहीन झालेले एक झाड
जे फ़ळत नाही, फ़ुलत नाही
बहरत नाही मी मोहरत नाही
हिरवळीच्या वाटेने जाताना
आपले काहीही नसण्याचे
दुखणे अनावर जागे होते ..
... तेंव्हा खास विसाव्यासाठी
ह्या झाडाची निवड केली आहे ...
२) संवादाला ...
.. पाचूच्या ह्या नवख्या बेटावर
माणसांपेक्षा झाडेच भेटतात
पाहिजे अन् तेंव्हा तिथे ...
बिनकामाचे अन् अव्यवहाराचे
सांगावे आजकाल कुणापुढे?
मुकपणे मग संवाद जमे
झुकून सळसळणार्या
ह्या मित्रापुढे ...
Wednesday, December 14, 2005
हरवलेल्या कवितांसाठी ..
नमस्कार. सद्या तरी काही ताजे लेखन सुचत नाही पण आजवर जे काही खरडले तेच इथे टाकावे असे वाटते आहे. आवडले तर अवश्य कळवा...
ही माझी सर्वात पहिली कविता जी मला अजूनही लिहिली तशीच आठवते. वहीच्या कोर्या पानावर मी कधीच कविता लिहून ठेवल्या नाहीत. एका जुन्या कंपनीतून नोकरी सोडताना मी सगळे काही घेतले, तेंव्हा वाटलं होतं कविताही कॉपी करून घेतल्यात. मग सहा महिन्यांनी जुन्याच कविता वाचायची इच्छा झाली. पाहतो तर कविता नावाचे फ़ोल्डरच नव्हते. खूप शोधले पण उपयोग झाला नाही. तेंव्हापासून मला कविता सुचत नाहीत.. जुन्या कवितांचा आशय आठवतो पण शब्द आठवत नाही. त्या नव्यानी लिहू गेलो तर तेही शक्य झाले नाही.
रानजाई
त्या तिथे पलिकडे
उंच वेली वाकलेल्या
पानापानात फ़ुलोरा लपलेला
काही पाखरांनी चाखलेला
झडलेल्या मोहराची
काळ्या भुईवर रांगोळी
रणरणत्या ग्रीष्म उन्हात
कोकीळसुरांची हाळी
बहरलेल्या रानजाईवर
फ़ुलपाखरांची उधळण
पळस पांगार्याचा वणवा
लख्ख उजळते घनवन
चिऊताईच्या खोप्यातून
तिच्या लेकराची फ़डफ़ड
अवघे रान हुंदळण्याची
माझ्या मनाची तडफ़ड
अजून एक जुनी कविता, जी इथे देण्याचे कारण म्हणजे इथल्याच एका मराठी ब्लॉगरने अनी फ़्रॅंकवर सुंदर लेख लिहून अनीच्या डायरीची आठवण करून दिली. ही डायरी वाचून मला भळभळून आले होते. कदाचित त्यामुळेच की काय मी युरोपमधे असताना अनीच्या 'त्या' घराला भेट दिली. तो दिवस माझ्या स्मृतीत कायमचा कोरला गेला आहे. संपूर्ण दिवसभर मी अनीच्या घरात वावरत होतो. मलाच कळत नव्हते की माझा पाय का इथून निघत नाही. शेवटी टुलिपच्या फ़ुलांचा गुच्छ रस्त्यावरील पुतळ्याच्या रुपाने उभी असलेल्या तिच्या चिमुकल्या पायाशी वाहून माझ्या bread N breakfast च्या घरी आलो. रात्री पडल्या पडल्या मला जे काही वाटले ती ही कविता सांगते आहे ...
I would probably change a lot of it if I re-wrote it, but that was what came out right then, so I suppose it has it's own emotional validity!
तुझ्या तेराव्या वाढदिवसाला भेटलीस म्हणून
'जिवेत शरदः शतम' म्हणू?
शहरात फ़ुललेले कोमल-हसरे टुलिप्स भेट देऊ
की अर्पण करू त्यांना तुझ्या चिमुकल्या पायाशी
सोळाव्या वसंताच्या ऐन बहरात दूर निघून गेलीस म्हणून?
कुठे ... कुठे आहेस अना तू?
तुझ्या चिरायु अक्षरांची आज गाथा झाली आहे,
करुणेने भरलेले असंख्य डोळे तुला शोधताहेत
जिवलग 'किटीच्या' पानापानातून
की कधीतरी तू समोर येशील
आपल्या उर्वरीत प्रवासाची हृदयभेदक कथा घेउन ...
हजारो हृदयात तुला जागा मिळाली आहे,
जिथे हसण्याच्या खळखळाटालाही आवाज नव्हता
तिथे गिळून बाहेर पडलेले आवंढे मुक-आक्रोश करतात
ग्वाही देतात तुझ्या म्हणण्याची
की- 'सगळे जीव सुहृदयीच असतात!'
निरापराध निरान्न देहाचे कैक ढिगारे
जेंव्हा एकजात पुरविले गेले तेंव्हाही
तुला असेच वाटले होते का?
की दुभंगून गेली ही माता अवनी
तुला आपल्या पोटात घेण्यासाठी
आणि मुक्त झाली अना निरागस किटीला मागे ठेवून?